बापू मुळीक
सासवड : महाराष्ट्र एस.टी कामगार संघटना सासवड आगाराच्या वतीने सासवड आगारातील कामगारांच्या आर्थिक व विविध असणाऱ्या प्रलंबित मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली. 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2024 या कालावधीत असणारी थकबाकी ही त्वरित जमा करावी, सन 2018 ची महागाई भत्त्याची थकबाकी ही न्यायालयाच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करणे, सन 2016 ते 2020 या कालावधीत एकतर्फी जाहीर केलेली वेतन वाढ मान्य केल्याप्रमाणे घरभाडे भत्त्याचा 8, 16,24 बाकी जमा करावी, सन 2016 ते 2020 या कालावधीसाठी एकतर्फी जाहीर केलेली वेतन वाढ यातील वार्षिक वेतन वाढीचा दर एक टक्क्यावरून कमी केलेला होता तो पूर्वीप्रमाणे तीन टक्के करून देऊन थकबाकी मिळावी अशी मागणी त्यांनी केली.
तसेच यावेळी सर्व थकबाकी रकमेच्या आधीन राहून कामगारांना सध्या मिळत असलेली वाढीव थकबाकी ही रक्कम पूर्वीप्रमाणे मार्च 2025 पासून पुढे तसेच सुरू ठेवावी, शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे रा .प कामगारांचा महागाई भत्ता 53% करून थकबाकी सह जमा करणे, भविष्य निर्वाह निधीच्या खात्यातून कामगारांच्या मागणीनुसार उचल द्यावी, प्रवासी भाडे वाढ पूर्वीप्रमाणे पाच रुपयाच्या पटीत वाढ करून सुधारित भाडे वाढ करावी, अन्यायकारक शिस्त व आवेदन पद्धत रद्द करून नवीन सुधारित शिस्त आवेदन पद्धत तयार करून लागू करावी या मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली.
त्याचबरोबर कोरोना कालावधीत कामगारांचे घेतलेले अर्ज रद्द करून त्यांना (एल. डी .पी) लॅ क डाऊन हजेरी लावून त्यांची रजा त्यांच्या खात्यावर वर्ग सहित करावी, 12 महिन्यात चालवण्यात येणाऱ्या रा. प नियताची सरासरी विचारात घेऊन कामगारांना समय वेतनश्रेणीवर (आर.टी.एस) घेण्याचे मान्य केल्याप्रमाणे परिपत्रकाचे सूचना आदेश काढावा व त्याची अंमलबजावणी करणे, मल्टीटेड बाबत माननीय महाव्यवस्थापक यांच्याकडून मान्य केल्याप्रमाणे यांच्या समवेत रा.प प्रशासन व संघटना प्रतिनिधी यांच्याशी त्वरित बैठक घेऊन तोडगा काढावा, खात्याअंतर्गत उत्तीर्ण झालेल्या कामगारांना बढत्या देताना प्रथम बदली अर्जानुसार बदल्या देऊन उर्वरित रिक्त जागावर बदल्या द्याव्या, कार्यशाळा कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढावी, कार्यशाळेला स्पेअर पार्ट पुरवठा करावा अशा विविध मागण्यासाठी संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
यावेळी कैलास जगताप, गणेश भुजबळ, पोपट जैनक, नितीन ओबळे यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. तर संघटनेचे राज्याचे नेते हनुमंत ताटे व संदीप शिंदे यांच्याबरोबर सर्व जण खंबीरपणे राहण्याचा निर्धार सर्व कामगारांच्या वतीने करण्यात आला. यावेळी संघटनेचे सचिव महेश भोंगळे, गणेश कामठे, प्रवीण पोमण, विकास काकडे, रूपाली गिरमे, ज्योती खोमणे, प्रतीक्षा यादव, ज्योतसना कवळे, विद्या गरुड इत्यादी पदाधिकारी शिवाय बहुसंख्येने सासवड आगारातील कामगार आदी उपस्थित होते.