लोणी काळभोर, ता. 5 : लहान मुलांच्या किरकोळ भांडणावरून दोन गटात दगडफेकीसह धारदार हत्यार व लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील पठारे वस्ती परिसरात असलेल्या इराणी गल्लीत मंगळवारी (ता.4) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला आहे. तर याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी 35 हून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 10 जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
याप्रकरणी अमिरु खानु ईराणी (वय 52, धंदा चष्माविक्री रा. ईराणी गल्ली, पठारे वस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मसाट ऊर्फ गुलाम मजलुम ईराणी, हसन ऊर्फ मन्ता मजलूम ईराणी, मोसन लालु ईराणी, मजलूम गुट्टेल हाजीसाब ईराणी, मरिअम मोसन ईराणी, अवनु ऊर्फ अलीरजा राजु ईराणी, महंमद मोसन ईराणी ऊर्फ गोजु, शाजमान ऊर्फ पठाण हाजीसाब ईराणी, राजु हौजी ईराणी, मरीअम मजलूम ईराणी, सिमु हाजीअली ईराणी, ममाई ऊर्फ फिल्मा हाजीअली ईराणी, नफीसा ऊर्फ मसाट फेरोज ईराणी, नफीस मसाट ऊर्फ गुलाम ईराणी, शब्बीर जावेद जाफरी ईराणी व इतर इसम (सर्व रा. इराणी गल्ली, पठारे वस्ती, कदमवाकवस्ती, पुणे) यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर मजलूम हाजीअली सय्यद (ईराणी) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमिरु खानु ईराणी, सिवी मंजुरी ईराणी, किमला मंजूर ईराणी, फातु मंजुर ईराणी, मुक्तार सय्यद ईराणी, अली अक्रम ईराणी, जीनद अली ईराणी, ईसफ सलीम ईराणी, सोहरा ईसफ ईराणी, शबाना अक्रम ईराणी, सकीना अक्रम ईराणी, मोहंमद नासर ईराणी, हैदर सलीम ईराणी, जेहरा जाफर ईराणी, मोहंमद इम्रान ईराणी, हैदर अली ईराणी, आब्बास ईसफ ईराणी, कासीम सलीम ईराणी, मोहंमद सय्यद ईराणी व इम्रान फेरोज ईराणी यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिरु ईराणी याचा चष्माविक्रीचा धंदा आहे. तर मजलूम सय्यद हा रिक्षाचालक आहे.
दरम्यान आरोपींमध्ये लहान मुलांच्या भांडणांवरून वादावादी झाली. या वादावादीचे रुपांतर भांडणामध्ये झाले. या भांडणात दोन्हीकडील लोकांनी विरुद्ध गटातील लोकांना लोखंडी रॉड, धारदार हत्यार व दगडांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर, गोपनीय विभागाचे प्रमुख रामदास मेमाणे, पोलीस हवालदार रवी आहेर, महेश चव्हाण, संदीप जोगदंड, निशा कोंढे, प्रशांत कळसकर, पोलीस अंमलदार संदीप धुमाळ, मंगेश नानापुरे यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी तणावाची परिस्थिती संवेदनशीलपणे योग्य हाताळून भांडणे मिटवली. व या भांडणात जखमी झालेल्या व्यक्तीला ताबडतोब उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. व भांडणे करणाऱ्या काही नागरिकांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील 35 हून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी पथके तयार करून मंगळवारी (ता.4) रात्री कॉम्बिंग ऑपरेशन करून आरोपींच्या घराची झाडाझडती घेतली. या कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये 10 आरोपींना अटक केली आहे.
मजलूम ईराणी, अक्नु ऊर्फ अलीरजा ईराणी, महंमद मोसन ईराणी ऊर्फ गोजु, राजु ऊर्फ हुसेन हाजी ईराणी, शहाजवान ऊर्फ पठाण ईराणी, शब्बीर जावेद जाफरी/ईराणी, मोहम्मद राजु ईराणी, हैदर सलीम ईराणी, मोहम्मद सय्यद नुर ईराणी व मुक्तार सय्यदनुर ईराणी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर रात्रीच्या वेळी महिला आरोपींना अटक करता येत नसल्याने दिवसा त्यांना अटक करण्यात येणार आहे. अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, दिगंबर सोनटक्के, पोलीस हवालदार गणेश सातपुते, रामहरी वणवे, संभाजी देवीकर, विलास शिंदे, प्रदीप गाडे, सुनील नागलोत, पोलीस अंमलदार शैलेश कुदळे, चक्रधर शिरगिरे, योगेश पाटील, बाजीराव वीर, राहुल कर्डिले यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव करीत आहेत.