पुणे : कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता प्रभू वालावकर हिने बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन गाजवला. अंकिताने टॉप 5 पर्यंत मजल मारली. बिग बॉसमधून बाहेर पडल्यापासून कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकरची लगीनघाई सुरु आहे. अशातच आता तिच्या लग्नाची पत्रिका समोर आली आहे.
अंकिता वालावकर आणि कुणाल भगत यांच्याकडे लगीनघाईला सुरुवात झाली आहे. अंकिताने इन्स्टाग्राम स्टोरीवर त्यांच्या लग्नाच्या पत्रिकेचा फोटो शेअर केला आहे. ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ‘कोकण हार्टेड गर्ल’ च्या लग्नपत्रिकेमध्येही खास कोकणी टच पाहायला मिळाला आहे.
अंकिताची पत्रिका खास केळीच्या पानाच्या डिझाइनची आहे. त्यामुळे खास कोकणी टच तिच्या पत्रिकेत पाहायला मिळाला. ज्यावर कुणाल आणि अंकिता यांची देवनागरीमध्ये नावं लिहिली आहेत. अंकिताच्या श्रीदेव लक्ष्मीनारायण मंदिरात ही पत्रिका ठेवली. याशिवाय ती मालवणमध्येही मंदिरात पत्रिका ठेवण्यासाठी गेली होती. कोकणी परंपरेनुसार या मंदिरांमध्ये पत्रिका ठेवल्याचे अंकिताने म्हटले.
आता लवकरच अंकिताच्या लग्नाच्या विधींना सुरुवात होणार आहे. लग्नाची पत्रिका समोर आली असली तरी लग्नाची तारीख अद्याप समोर आलेली नाही. आता लवकरच अंकिताच्या लग्नाच्या विधींना सुरुवात होणार आहे.