पुणे : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका युवतीवर झालेल्या बलात्कार प्रकरणामुळ केवळ पुण्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात संतापाचे वातावरण पसरला आहे. या प्रकरणातील फरार आरोपी दत्तात्रय गाडेच राजकीय कनेक्शन ही समोर आल आहे. पोलिसांची 13 पथके त्याचा शोध घेत आहे. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नराधम कोणत्याही पक्षाचा असो, कारवाई होणारच अशी प्रतिक्रिया दिली आहे.
या पुण्यातील घटनेनंतर पोलिसांच्या तपासाला ही वेग आला आहे. याबाबत मी स्वत: पुणे पोलीस आयुक्तांशी बोललो. यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना सरकारच्या वतीने आम्ही दिल्या आहेत. आरोपीला कोणत्याही परिस्थितीत अटक होईल. त्याचे सगळे लागेबांधे आहेत, ते पोलिसांच्या हाती आले आहेत. मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालून आहेत,अजितदादा लक्ष देत आहेत. दरम्यान राज्यात अशा प्रकारचें अत्याचार नराधम करत असतील तर त्यांची खैर केली जाणार नाही आमच्या लाडक्या बहिणीला सुरक्षित राहिल्याच पाहिजेत असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
पुण्यातील घटनेनंतर विरोधकांकडूनही सत्ताधाऱ्यांवर आरोप केले जात आहेत. यावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कोणीही कोणत्याही पक्षाचा असूद्या, कुणाशीही संबंधीत असूद्या, अशाप्रकारच्या गुन्हेगाराला गय केली जाणार नाही. कुणाशीही संबंध असू द्या, कुणाशीही लागेबांधे असूद्या..हा गुन्हेगार गुन्हेगार आहे. लाडक्या बहिणींवर अत्याचार करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.