पुणे : राज्यात ताममानाचा पारा झपाट्याने वाढत असून उन्हाच्या झळा वाढल्या आहेत.मार्च महिना सुरू होताच सूर्य तापायला लागला आहे. दरम्यान आज कोकणात उष्ण लाटेची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे, उर्वरित राज्यात कमाल तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत.पुणे, जळगाव, कोल्हापूर, निफाड, सातारा, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि नागपूर येथे तापमानाचा पारा ३६ अंशांच्या पार होता. कमाल तापमानात वाढ टिकून असल्याने झळा वाढल्या असून, उकाड्यामुळे अंगाची लाही होत आहे. राज्यात सर्वाधिक तापमान 38.8 सोलापूर मध्ये नोंदवली जात आहे तर पुणे 36.4° अंशावर गेला आहे.
आज कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याचा, तर सिंधुदुर्गात हवामान सरासरीपेक्षा उष्ण व दमट राहणार असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याचा शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.