पुणे: पुणे महापालिकेच्या निर्णयानुसार, पुणे शहरातील अनेक सार्वजनिक उद्याने आता रात्री 9 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. यामुळे नागरिकांना रात्री 9 पर्यंत उद्यानांमध्ये थांबता येणार आहे. पुण्यातील उष्णतेमुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी पुणे महापालिकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यभरात तापमानाचा पारा वाढताना दिसत आहे. तसेच लहान मुलांच्या परीक्षा संपल्यामुळे चिमुकल्यांसाठी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे महापालिकेने सार्वजनिक उद्यानांची वेळ एक तास वाढवण्याचा निर्णय घेतला कारण उद्यानात दुपारी उन्हामुळे कोणी जात नाही. रात्री गारवा असल्याने नागरिक बराच वेळ उद्यानात थांबू शकता, त्यामुळे अधिकचा एक तास उद्याने सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
तर महापालिकेकडून प्रत्येक उद्यानांची तपासणी देखील केली जाणार आहे. शिवाय, पुणे महापालिकेकडून प्रत्येक उद्यानाची तपासणी करण्यात येईल आणि उद्यानाची आवश्यक ती डागडुजी देखील करण्यात येईल. पुणे शहरातील 220 हून अधिक सार्वजनिक उद्याने रात्री 9 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. सध्या उष्णतेमुळे मार्च महिन्यातच नागरिक हैराण झाले आहेत.
उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून शालेय सुट्ट्या देखील सुरु झाल्या आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेने सार्वजनिक उद्यानांची वेळ एक तास वाढवण्याचा निर्णय महत्वाचा ठरणार आहे.