पुणे : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतुन दरमहा महिलांना पंधराशे रुपये जमा केले जातात. आतापर्यंत जुलै ते जानेवारी या महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले होते. फेब्रुवारीच्या महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे बहिणीच्या नजरा लागल्या होत्या. मात्र महिना संपत आला तरी पैसे जमा न झाल्याने महिलांमध्ये निराशा झाली. आता याबाबत मोठी माहिती समोर आली असून लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहेत. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकूण तीन हजार रुपयेचा हप्ता आता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीला मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यात महायुती सरकार सत्तेत आणण्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली होती. निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा करण्यात येत होते निवडणूक जिंकल्यानंतर दरमहा २१०० रुपये आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिलं होतं. दरम्यान आता मार्च महिन्यात महिलांना २१०० रुपये देणार असल्याची चर्चा होत आहे. अर्थसंकल्पानंतर महिलांसाठी २१०० रुपये होण्याची घोषणा आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे आता पुढच्या महिन्यात एकूण किती पैसे मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे.
फेब्रुवारी महिना संपत आला तरी महिलांच्या खात्यात अजूनही पैसे जमा झाले नसल्याने लाडक्या बहिणी चिंतेत होत्या मात्र आता दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र येणार आहेत.लाडकी बहीण योजनेत अर्जांच्या पडताळणीनुसार नऊ लाख लाडक्या बहिणीचे अर्ज बाद झाले आहेत.
दरम्यान, ही पडताळणी ५ टप्प्यांमध्ये केली जाणार आहे. त्यातील काही अर्जांची पडताळणी झालेली आहे. फेब्रुवारी मार्च महिन्याच्या हत्याकडे लाडक्या बहिणीचे लक्ष लागल आहे.