पुणे : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मास्टरमाइंड वाल्मीक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचं सीआयडीने दाखल केलेल्या चार्जशीटमधून समोर आल आहे. या प्रकरणातील वाल्मीक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता. अशातच आता करुणा मुंडे यांच्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उद्या अर्थसंकल्पाच्या पहिल्याच दिवशी धनंजय मुंडे राजीनामा देणार असल्याच त्यांनी म्हटलं आहे.
राज्यात उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत असून आता पहिल्याच दिवशी मंत्री धनंजय मुंडे राजीनामा देणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. करुणा शर्मा यांनी आपल्या पोस्टमध्ये 3-3-2025 को धनंजय मुंडे इनका राजीनामा होगा, असं म्हटलं आहे. वाल्मीक कराड प्रकरणात विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड हा अंतिम चौकशीत दोषी निघाला तर मी स्वतः राजीनामा देईल असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं होतं.त्यानुसार अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा लिहून घेतल्याचा दावा अरुणा मुंडे यांनी केला आहे. त्यामुळे उद्या धनंजय मुंडे राजीनामा देणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
धनंजय मुंडे हे उद्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांनी वाल्मीक कराड दोषी निघाला तर मी स्वतः राजीनामा देईल असं म्हटलं होतं त्यानुसार धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार असा दावाच करुणा मुंडे यांनी केला आहे.