पुणे : उन्हाळ्याला सुरुवात झाली असून या काळात स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी काकडीचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते त्यामुळे या हंगामात काकडीला मोठी मागणी असते. या कडक उन्हाळ्यात काकडी, कलिंगड खाणं तब्येतीसाठी चांगलं. उन्हाळ्यात तुम्ही दिवसाची सुरुवातच काकडीच्या ज्यूसनं करु शकता.रोज सकाळी उठल्यावर काकडीचा ज्यूस प्या. काकडीच्या ज्यूसमध्ये भरपूर फायबर असतं, यामुळे पचनाला मदत होते आणि काकडीमुळे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते.
काकडीच्या रसात 80 ते 90 टक्के पाणी असतं, यामुळे शरीराला पुरेशी आर्द्रता मिळते. काकडीच्या रसात नैसर्गिकरित्या पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स असतात, ज्यामुळे हायड्रेशन राखण्यास मदत होते.त्यात आवश्यक अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्व ए, सी आणि के देखील असतात. काकडीच्या ज्यूसमुळे त्वचा मुलायम आणि चमकदार होते. यामुळे प्रतिकारशक्ती वाढते आणि डोळ्यांसाठी देखील काकडी फायदेशीर असते.