पुणे : शेअर बाजारातील घोटाळा आणि नियामक उल्लंघनाच्या आरोपांवर मुंबईतील विशेष लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयाने सेबीच्या माजी प्रमुखांसह पाच अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाचे हे आदेश म्हणजे भारतीय शेअर बाजारातील नियामक यंत्रणावर मोठे प्रश्नचिन्ह उभे करणारे ठरणार आहेत. कोर्टाच्या या निर्णयामुळे सेबीचे अधिकारी चांगलेच अडचणीत आले आहेत.
भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डच्या माजी अध्यक्षा माधवी पुरी बुच आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध मुंबईतील विशेष लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयाने नुकतेच एफ आय आर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.या प्रकरणाबाबत दाखल केलेल्या तक्रारीत शेअर बाजारात मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये सेबीच्या अधिकाऱ्यांवर नियामक उल्लंघन, भ्रष्टाचार, आणि घोटाळा,अपात्र कंपनीची फसवणूक करून लिस्टिंग घडवून आणल्याचा आरोप आहे.
तक्रारीनुसार, सेबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कायदेशीर जबाबदाऱ्यांचे पालन केले नाही. दरम्यान तक्रारदानाने यापूर्वी कायदा अंमलबजावणी संस्थांना आणि नियमाक संस्थांना तक्रारी दिली होत्या,मात्र कोणतीही कारवाई झाली नाही असेही सांगितले.त्यामुळे न्यायालयाने यामध्ये हस्तक्षेप करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान न्यायालयाने या प्रकरणाचा आढावा घेतल्यानंतर मुंबई ACB वरळी विभागाला इतकं, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा,सेबी कायदा आणि इतर संबंधित कायद्यानुसार एफ आय आर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत