पुणे : अभिनेता राहुल सोलापूरकर छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतरही राहुल सोलापूरकर याला पुणे महापालिकेने मानाचे स्थान दिले. पुणे शहराचे सांस्कृतिक धोरण ठरवणाऱ्या समितीत तज्ञ सल्लागार म्हणून त्याची निवड करण्यात आल्याने विरोधकांनी जोरदार टीका केली. आता सोलापूरकरच्या निवडीवर पुणे महापालिकेकडून परिपत्रक काढून स्पष्टीकरण देण्यात आल आहे.सद्यस्थितीत कोणतीही समिती नेमण्यात आलेली नाही कृपया ह्याची नोंद घ्यावी, असे स्पष्टीकरण पुणे महानगरपालिकेच्या सांस्कृतिक विभागाच्या उपआयुक्तांनी दिली आहे.
पुणे शहराचे सांस्कृतिक धोरण ठरवणाऱ्या समितीत राहुल सोलापूरकर याचं नाव आल्याने विरोधकांकडून टिकेची झोड उठली आहे. डिसेंबर 2023 मध्ये पुणे शहरासाठी सांस्कृतिक धोरण बनवण्याकरता सल्लागाराची नेमणूक केली होती. त्यानंतर या सदर सल्लागाराने पुण्यातील सांस्कृतिक क्षेत्रातील विविध तज्ञ व्यक्तींशी चर्चा करून सांस्कृतिक धोरणाचा मसुदा तयार केला. या मसुद्यामध्ये ज्या तज्ञ व्यक्तींशी चर्चा केली त्या व्यक्तींची नावे नमूद केलेली आहेत. त्यानुसार यामध्ये सद्यस्थितीत कोणतीही समिती स्थापन केलेली नाही. सदर सांस्कृतिक धोरण सादर केले असले तरी त्यावर सर्वांशी चर्चा करूनच अंतिम मसुदा तयार करण्यात येणार आहे.तसेच हे धोरण ही मान्य करण्यात अजून आलेली नाही, स्पष्टीकरण पुणे महानगरपालिकेने दिल आहे.
गेल्या तीन वर्षापासून पुणे शहराचे सांस्कृतिक धोरण ठरवण्याचे काम सुरू आहे. हे धोरण ठरवणाऱ्या सल्लागार समितीत राहुल सोलापूरकर याचं नाव आधीपासूनच आहे. मात्र आता त्याचं नाव समोर आले आहे. आता या पुणे शहराच्या सांस्कृतिक धोरण समितीत राहुल सोलापूरकर यांच्या नावाला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला आहे.