तुषार ओहोळ
बारामती : बारामती शहरातील सन २०२४- २०२५ या वित्तीय वर्षामध्ये बारामती नगरपरिषद हद्दीतील थकित मालमत्ता धारक यांना अधिपत्र बजावून वांरवार घरभेटी देवूनही मालमत्ता धारक यांनी नगरपरिषद कार्यालयाकडे वसुलीचा भरणा केलेला नाही . त्यामुळे वसुली पथके व जप्ती पथकाव्दारे थकित मालमत्ता धारकावर धडक कारवाई करून मालमत्ता सील , जप्ती करणे , जप्त केलेला माल अटकाव करणे इत्यादी नियमोचित करणेचे काम युध्द पातळीवर चालू आहे.
सन २०२४ – २०२५ या वित्तीय वर्षाची घरपट्टी व पाणीपट्टी बिले भरलेली नसेल तर खालील प्रमाणे भरणा करू शकता बारामतीकर आता भरा , ऑनलाईन मिळकत कर .
१) ऑनलाईन वेबसाईटव्दारे WWW.baramartimc.org
२) मोबाईल ॲप व्दारे BRM TAX APP
३) CARD PAYMENT CREDIT, DEBIT व्दारे
४ ) RTGS , NEFT,IMPS,SI WALLET व्दारे
५)QR CODE व्दारे
६) नागरीसुविधा केंद्राव्दारे
बारामती शहरातील वाढीव व मुळ हद्दीतील मिळकत धारकांना घरपट्टी व पाणी पट्टी भरण्याचे आवाहन नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे.