शिरूर : शिरूर शहरातील शाळा व कॉलेजमधील मुलामुलींना अश्लील वर्तन करण्याची मुभा देऊन त्यासाठी अवैध पार्टिशन टाकलेल्या‘ द स्टीम रुम ‘या कॅफे चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे . आकाश रमेश लभडे वय २३ वर्ष, रा. अरणगाव असं या कॅफे चालकाचे नाव आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर शहर व परिसरातील शाळेतील तसेच कॉलेजमधील मुला -मुलींना अश्लील वर्तन करण्यास मुभा देण्यासाठी’ द स्टीम रुम ‘ या कॅफेमध्ये अवैध पार्टेशन केले असुन त्यामध्ये काही शाळकरी मुले व मुली हे असभ्य व अश्लील वर्तन करीत असल्याची माहिती मिळाली होती . त्यानुसार सदर कॅफेवर तात्काळ कारवाई करणेबाबतचे आदेश पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी तपास पथकाला दिले होते. त्यानुसार पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, महिला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव, पोलीस अंमलदार नितेश थोरात, रविंद्र आव्हाड हे साध्या वेशात शिरूर शहारामधील रेव्हेन्यु कॉलनी येथील या कॅफेमध्ये जावुन नाष्टा ऑर्डर देवुन बसले असताना त्यांना कॅफे चालकाने पार्टिशन केलेल्या रूममध्ये मुला मुलींचे असभ्य वर्तन आढळून आले.दरम्यान याप्रकरणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नंबर १५६/२०२५ भा न्या संहिता कायदा कलम २९६ अन्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस अमंलदार रविंद्र बापुराव आव्हाड यांनी फिर्याद दिली आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार देविदास खेडकर हे करीत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे , उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले , पोलीस निरीक्षक संदेश केंजळे ,यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोसई शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, देवीदास खेडकर, महिला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव, पोलीस अमंलदार सचिन भोई, नितेश थोरात, रविंद्र आव्हाड, निरज पिसाळ, अजय पाटील यांचे पोलीस पथकाने केली आहे .