तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या तुळजापुरात ड्रग्जचे रॅकट उघडकीस आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. आता या तुळजापुरातील ड्रग्स तस्करी प्रकरणी तामलवाडी पोलिसांनी धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयात 10 हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे.या दोषारोप पत्रात अनेक गंभीर मुद्द्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
या ड्रग्स तस्करी प्रकरणी तपास अधिकारी गोकूळ ठाकूर यांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे . दोषारोपपत्र सादर केल्याने सुनावणीला वेग येणार आहे. याप्रकरणात एकूण 35 जणांवर गुन्हे, 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे .तर 21 आरोपी फरार असून 80 जणांना नोटीस बजावण्यात आली आहे.या दोषारोप पत्रातआरोपीचे जवाब, घटनास्थळ, पंचनामा, सिडीआर या सह इतर बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. मुंबई, सोलापूर, पुणे येथील ड्रग्ज कनेक्शन असल्याचा ही उल्लेख या दोषारोपत्रात करण्यात आला आहे.
तुळाजापुर तालुक्यातील तामलवाडी येथे ड्रग्जचा मोठा साठा जप्त केला होता. तेव्हापासून ड्रग्ज तस्करीबाबत अनेक खुलासे समोर आलेत. याप्रकरणात पोलिसांनी ड्रग्ज पेडलर्सना अटक केली. त्यानंतर या ड्रग्ज विक्रिचे धागेदोरे मुंबईपर्यंत पोहोचली. मुंबईतून ड्रग्ज तस्करीप्रकरणी संगीता गोळे हिला अटक करण्यात आली. विशेष पथकांची नेमणूक करत पोलिसांकडून तपास केला जात आहे . यात पुजा-यांचा सहभाग असल्याच समोर आले. राज्यभर चर्चेत आलेल्या या तुळजापूर ड्रग्स प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली आहे.