पुणे : तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात नोकरी मिळू शकते. त्यानुसार, आता अनेक रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे वरिष्ठ संशोधन फेलो (SRF), यंग प्रोफेशनल-I आणि कुशल कामगार या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला अकोला येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 6 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 37000 रुपयांपर्यंत पगारही मिळणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.pdkv.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वरिष्ठ संशोधन फेलो (SRF), यंग प्रोफेशनल-I आणि कुशल कामगार.
– एकूण रिक्त पदे : 06 पदे
– नोकरीचे ठिकाण : अकोला.
– शैक्षणिक पात्रता : बारावी उत्तीर्ण, डिप्लोमा, पदवीधर, एम.टेक.
– वेतन / मानधन : दरमहा 15,000 ते 37,000 पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल).
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 फेब्रुवारी 2025.
– अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी : [email protected]
Job profile ky ahe
Job
I am ram Bhande my education m. Com english complet
At.rajura ghate post. Nimbha tq.murtizapur district akola