पुणे : पुण्यातील ‘नॅशनल केमिकल लॅबोरेटरी’ येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी 9 मार्च, 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी’, पुणे येथे प्रोजेक्ट असिस्टंट-II, प्रोजेक्ट असोसिएट-II, प्रोजेक्ट असोसिएट-I यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत सात रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्रोजेक्ट असिस्टंट-II, प्रोजेक्ट असोसिएट-II, प्रोजेक्ट असोसिएट-I.
– एकूण रिक्त पदे : 07 पदे.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा, मास्टर / इंटिग्रेटेड मास्टर्स, बॅचलर डिग्री.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 20,000/- ते रु. 35,000/- पर्यंत.
– वयोमर्यादा : 35 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 मार्च 2025.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.ncl-india.org/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.