पुणे : नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या विद्यापीठात आता रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. 27 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर येथे प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी (करार तत्वावर) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत दोन रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 50000 ते 100000 रुपयांपर्यंत पगारही मिळणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.nagpuruniversity.org/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.