पुणे : चांगली नोकरी मिळवण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न केले जातात. त्यात विविध परीक्षा, मुलाखती दिल्या जातात. पण तरीही काहीवेळा नोकरी मिळण्याची ही संधी हुकतेच. मात्र, अजूनही तुम्ही चांगल्या नोकरीसाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, पुण्यातील नवोदय विद्यालयात नोकरी मिळू शकणार आहे. त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.
जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधीच असणार आहे. पुण्यातील नवोदय विद्यालय समिती प्रादेशिक कार्यालय, पुणे येथे वसतिगृह अधीक्षक आणि समुपदेशक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. यात काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मे, 2025 असणार आहे.
या भरती प्रक्रियेंतर्गत वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://navodaya.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.