पुणे : ठाणे महापालिकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी 21 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ठाणे महापालिकेत एमपीडब्ल्यू यासह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला ठाणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 58 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : बहुउद्देशीय कर्मचारी (एमपीडब्ल्यू)
– एकूण रिक्त पदे : 58 पदे.
– नोकरीचे ठिकाण : ठाणे.
– शैक्षणिक पात्रता : 12वी विज्ञान + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरीमध्ये उत्तीर्ण.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 18,000/-.
– वयोमर्यादा : 18-64 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 07 मार्च 2025.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 मार्च 2025.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाखरी, ठाणे (प)-400602.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://thanecity.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.