पुणे : तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे नोकरीची संधी मिळू शकणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी 21 एप्रिल, 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे चाचणी समन्वयक अर्थात टेस्ट को-ऑर्डिनेटर या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी एचआरडी विभाग (प्रकल्प कार्यालय) टाटा मेमोरियल हॉस्पिटल, सर्व्हिस ब्लॉक बिल्डिंग, चौथा मजला, डॉ. ई. बोर्जेस मार्ग, परळ, मुंबई-400012 येथे अर्ज पाठवावा लागणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : टेस्ट को-ऑर्डिनेटर (चाचणी समन्वयक)
– एकूण रिक्त पदे : 01 पद.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई
– शैक्षणिक पात्रता : विज्ञानात पदव्युत्तर पदवी (एम.फार्म, लाइफ सायन्सेस, बायोटेक, प्राणीशास्त्र, वनस्पतिशास्त्र इ.). क्लिनिकल रिसर्चमध्ये पीजी डिप्लोमा अनिवार्य.
– वेतन / मानधन : दरमहा 27000 ते 67000 रुपयांपर्यंत.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 21 एप्रिल 2025.
– मुलाखतीचा पत्ता : एचआरडी विभाग (प्रकल्प कार्यालय) टाटा मेमोरियल हॉस्पिटल, सर्व्हिस ब्लॉक बिल्डिंग, चौथा मजला, डॉ. ई. बोर्जेस मार्ग, परळ, मुंबई – 400012.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
https://tmc.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.