पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, वस्त्रोद्योग मंत्रालयात अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत आता तुम्हाला अर्ज करता येणार आहे. थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारीची निवड केली जाणार आहे.
वस्त्रोद्योग समिती, वस्त्र मंत्रालय येथे प्रकल्प सहयोगी (सल्लागार), प्रकल्प सहाय्यक (ज्युनियर सल्लागार), तांत्रिक अधिकारी या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 10 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. सदर मुलाखत ही आरएसए, दुसरा मजला, वस्त्रोद्योग समिती, (भारत सरकार, वस्त्रोद्योग मंत्रालय) पी. बाळू रोड, प्रभादेवी चौक, प्रभादेवी, मुंबई-40025 येथे घेतली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्रकल्प सहयोगी (सल्लागार), प्रकल्प सहाय्यक (ज्युनियर सल्लागार), तांत्रिक अधिकारी.
– एकूण रिक्त पदे : 10 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– शैक्षणिक पात्रता : बी.ई./बी.टेक टेक्सटाईल किंवा बी. / बीएफ टेक.
– वेतन / मानधन : दरमहा 50000 ते 70000
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 24 मार्च 2025.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://textilescommittee.nic.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.