पुणे: तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे नोकरीची संधी मिळू शकणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन या माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी 6 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई येथे कंपनी सचिव प्रशिक्षणार्थी या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी परीक्षा आणि मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत तीन रिक्त पद भरली जाणार आहेत.
संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : कंपनी सचिव (प्रशिक्षणार्थी)
– एकूण रिक्त पदे : 03 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल).
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 21 फेब्रुवारी 2025.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 मार्च 2025.
– अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी : [email protected]
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.shipindia.com/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.