पुणे : कोल्हापूर येथील कर्मचारी राज्य विमा महामंडळ अर्थात ESIC येथे आता नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, काही रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
कर्मचारी राज्य विमा महामंडळ, कोल्हापूर येथे अर्धवेळ विशेषज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला कोल्हापूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 6 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
त्यासाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळ रुग्णालय, कोल्हापूर, सर्किट हाऊसच्या मागे, ताराबाई पार्क, कोल्हापूर 416 003 येथे जाऊन मुलाखत द्यावी लागणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : अर्धवेळ विशेषज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी.
– एकूण रिक्त पदे : 06 पदे.
– नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर.
– शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस पदवी किंवा पी.जी.सह एमबीबीएस. पीजी डिप्लोमासह पदवी किंवा एमबीबीएस.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 56,100/- ते रु. 60,000/- पर्यंत.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 30 जानेवारी 2025.
– मुलाखतीचा पत्ता : कर्मचारी राज्य विमा महामंडळ रुग्णालय कोल्हापूर, सर्किट हाऊसच्या मागे, ताराबाई पार्क, कोल्हापूर 416 003.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
https://www.esic.nic.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.