सध्याच्या धकाधकीच्या जीवनात संसारातील असो वा कामातील ध्येय गाठण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. त्यामध्ये अनेक समस्या उद्भवू शकते. त्यात अभ्यासात असे दिसून आले की, पुरुषांपेक्षा महिलाच जास्त प्रमाणात ताणतणावात असतात. त्याची लक्षणेही समोर आली आहेत. त्याचीच माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, नैराश्य कोणालाही येऊ शकते. परंतु पुरुषांपेक्षा स्त्रियांना नैराश्येचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. जे लोक काही तणावातून जात आहेत किंवा काही गैरवर्तन किंवा गंभीर नुकसान झाले आहे, अशा लोकांमध्ये नैराश्येची समस्या अधिक सामान्य आहे. अनेक वेळा लोक नैराश्येच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. जे भविष्यात गंभीर समस्येत रूपांतरित होऊ शकते. जर एखाद्याला अचानक सतत दुःखी वाटू लागले तर ते नैराश्येचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत नैराश्यग्रस्त व्यक्तीशी बोलले पाहिजे.
चिडचिड हे नैराश्येचे लक्षण असू शकते. जर एखादी व्यक्ती अचानक चिडचिडी झाली. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीमध्ये एक किंवा दोन आठवडे चिडचिडेपणा दिसला तर तुम्ही त्याच्याशी बोलले पाहिजे. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उपचार आणि थेरपीच्या मदतीने नैराश्य दूर केले जाऊ शकते. यांसारखी लक्षणे महिलांमध्येच अधिक प्रमाणात दिसून येतात.