पुणे प्राईम न्यूज डेस्क: आपल्या शरीरामध्ये खनिजे आणि क्षार पदार्थ यांचे प्रमाण वाढल्यास शरीरामध्ये किडनी स्टोन म्हणजेच मुत खडा होतो. जेंव्हा जेंव्हा आपल्या पोटात ऑक्जालेट, कॅल्शिअमसारखे क्रिस्टल्स जमा होतात तेंव्हा गाठी सारखा पदार्थ तयार होते. ही गाठ दगडासारखी कठीण असते. यालाच किडनी स्टोन असे म्हणतात. स्टोन किडनीमध्ये होतो त्यामुळे याला किडनी स्टोन असे म्हणतात.
हे आहेत कारणं
निर्जलीकरणामुळे मुतखडा होऊ शकतो. तसेच पालक, काजू आणि चॉकलेट तसेच मीठ अशा ऑक्जलेटयुक्त पदार्थांचे जास्त सेवन केल्यामुळेही मुतखडा होतो. अधिक प्रथिनयुक्त आहार घेतल्यानेही मूत्रपिंडात खडे तयार होऊ शकतात. कुटुंबाची जनुकीय पार्श्वभूमी, हायपरपॅराथायरॉईडीझम, लठ्ठपणा, मूत्रमार्गाचा संसर्ग यासारख्या आजारांमुळेही मूत्रपिंडात खडे होऊ शकतात.
किडनी स्टोनची लक्षणे:
1. पाठीच्या खालच्या भागात, ओटीपोटात तीव्र वेदना होणे
2. लघवी करताना वेदना होणे
3. लघवीवाटे रक्त किंवा लाल रंगाची लघवी होणे
4. सतत लघवी करण्याची इच्छा होणे
5. मळमळ आणि उलट्या होणे
अशी मूतखड्याची लक्षणे आहेत. याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये. नियमित व्यायाम, योग्य आहार हा मूतखडा तयार होण्याचा धोका कमी करतो. तुमच्या मूत्रपिंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. हा आजार टाळण्यासाठी पुरेश्या प्रमाणात पाणी प्ययला हवे.