पुणे प्राईम न्यूज डेस्क: आपल्या निसर्गात अशी अनेक फळे, वनस्पती, भाज्या आहेत त्याचे काहीना काहीतरी विशेष असे फायदे आहेत. फळांमध्ये विविध फळांचे विविध गुण आपल्याला पाहायला मिळतात. त्यात केळी हे फळ अगदी सहज आणि स्वस्तात असे उपलब्ध असते. हृदयासाठी केळी फायदेशीर असतेच, शिवाय मधुमेहावरही प्रभावी ठरू शकते. या केळीमध्ये अनेक असे घटक आहेत त्याने आरोग्यावर सकारात्मक असा परिणाम होतो.
केळी खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित करता येऊ शकते. पाचक आरोग्यासाठी चांगले ठरते. शिवाय, केळी हृदयासाठी फायदेशीर मानली जाते. पोट दीर्घकाळ भरलेले ठेवते. मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी केळी गुणकारी ठरते. तसेच केळीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6 असतात. याने आरोग्याला फायदा होतो. केळी व्हिटॅमिन सीसह आवश्यक व्हिटॅमिन्सचा पुरवठा करते. याने रोगप्रतिकारक शक्तीही वाढण्यास मदत होते. केळी हे फळ मेंदूच्या आरोग्यासाठी आणि चयापचय प्रक्रियेसाठी फायदेशीर आहे. केळी हे फळ प्रोटीनचा उत्तम स्रोत नसले तरी त्यामध्ये काही प्रमाणात असतात.
केळी फॅटमुक्त असतात. ज्यामुळे फॅटचे सेवन कमी करू पाहणाऱ्यांसाठी ते उत्तम पर्याय बनतात. वजन कमी करण्यासाठी तुम्ही केळी खाऊ शकता. केळीमध्ये असलेले फायबर आतड्याच्या हालचालींना मदत करून पचनास फायदेशीर ठरतात. केळीमुळे भूक व्यवस्थापित करण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही अजूनही केळी नियमित खात नसाल तर ती डॉक्टरांच्या सल्ल्याने खाण्यास सुरू नक्की करा. त्याने फायदा होऊ शकतो.