तरुणपणात आपण अनेक आव्हानं, जिद्द करतो. पण, उतारवयात यावर मोठ्या प्रमाणात बंधने येत असतात. त्यामुळे काय करावं काय नको हे अनेकांना समजत नाही. त्यात तुम्हाला उतारवयात काय काळजी घ्यावी हे समजत नसेल तर त्याची माहिती आम्ही तुम्हाला आता देणार आहोत.
उतारवयात हातपाय दुखणे, पिकलेले केस, चेहऱ्यावर सुरकुत्या येणे ही सगळी वय झाल्याची लक्षणे आहेत असे आपण म्हणू शकतो. आता तुमचे वय झाले आहे हे बऱ्याचदा तुमचा चेहराच इतरांना सांगत असतो. आहारातील व्हिटॅमिनचे सेवन तुमचे सौंदर्य अबाधित ठेऊ शकते. नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात हे सिद्ध झाले आहे. आहारात व्हिटॅमिन सी चे सेवन करणे हे आरोग्याच्या दृष्टीने जसे फायदेशीर आहे, तसेच ते त्वचा निरोगी ठेऊन सौंदर्य अबाधित राखण्यासाठीही फायदेशीर ठरते.
शरीराला आकर्षक आणि तरूण बनवणाऱ्या काही पेशी आपल्या शरीरात असतात. वाढत्या वयाबरोबर या पेशी कमकुवत होऊ लागतात. तेव्हा व्हिटॅमिन सी हे शरीरातील या पेशींमध्ये मिसळते. ते पेशींमध्ये मिसळून त्या पेशींना बळ प्रदान करण्याचे कार्य करते. याने फायदा होऊ शकतो.