हात-पाय काळे पडण्याची समस्या आपल्यापैकी अनेकांना सतावत असेल. हात-पाय काळे पडण्याची कारणे अनेक असू शकतील. त्यात सन टॅनिंग, प्रदूषण आणि योग्य काळजी न घेणे आणि त्वचेची स्वच्छता न राखणे ही कारणे असू शकतात. यामुळे आपल्या त्वचेचा टोन खराब होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही काही घरगुती उपाय केल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते.
काळे पडलेले हात-पाय कसे स्वच्छ करावे अशा प्रश्नात तुम्ही असाल तर पायाचा काळेपणा दूर करण्यासाठी एक बादली गरम पाणी घेऊन त्यात शॅम्पू, बेकिंग सोडा आणि मीठ घालून मिक्स करा. आता या पाण्यात पाय 25-30 तास भिजवा. वेळ संपल्यानंतर, आपले पाय धुवा आणि नंतर मॉइश्चरायझर लावा. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही आठवड्यातून दोन दिवस किंवा आठवड्यातून एकदा हा उपाय करू शकता. तसेच हातातील काळेपणा कसा काढायचा हे तुम्हाला वाटत असेल तर तेही आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.
हातावरील काळेपणा दूर करण्यासाठी लिंबाच्या सालींची गरज पडू शकते. लिंबाच्या सालींमध्ये प्रभावी गुण आहे. मात्र, ही पद्धत वापरण्यासाठी हात, कोपर, पाय आणि गुडघे यांसारख्या काळ्या आणि टॅन भागांवर दररोज लिंबाची साल चोळा. यामुळे सर्व काळेपणा दूर होऊन तुमची त्वचा उजळू शकते. या घरगुती पर्यायांचा अवलंब केल्यास नक्कीच चांगला फरक दिसून येऊ शकतो.