झोप ही आपल्या शरीरासाठी अत्यंत गरजेची असते. आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगली झोप खूप महत्त्वाची असते. पण, झोपेचा अभाव केवळ थकवा आणि तणाव वाढवू शकत नाही तर त्याचा आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर, स्मरणशक्तीवर आणि काम करण्याच्या क्षमतेवरही नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी काही सवयी अंगीकारल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते. याने फायदाही होतो.
ठराविक वेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय लावणे झोपेसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. यामुळे शरीरही त्याप्रमाणे रिअॅक्ट करते. याने मनाला आरामदायी स्थितीत येण्यास मदत होते. आठवड्यातील प्रत्येक दिवशी एकाच वेळी झोपण्याचा आणि उठण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून शरीराचे घड्याळ योग्यरित्या कार्य करू शकेल. झोपण्यापूर्वी टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप इत्यादींचा जास्त वापर टाळा. या उपकरणांमधून निघणारा निळा प्रकाश आपल्या झोपेत बाधा ठरतो आणि मेलाटोनिनचे (झोप आणणारे संप्रेरक) उत्पादन कमी करतो. म्हणून, झोपण्यापूर्वी किमान 30 मिनिटे आधी इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून दूर राहा.
ध्यान आणि प्राणायाम केल्यास उत्तम ठरू शकते. याने केवळ मानसिक शांती देत नाहीत तर तणाव आणि चिंता देखील कमी करतात. झोपण्यापूर्वी काही मिनिटे ध्यान किंवा दीर्घ श्वासोच्छवासाचे व्यायाम केल्याने मन शांत होण्यास आणि चांगली झोप येण्यास मदत होते. हे मानसिक शांती आणते तसेच शरीराला आराम देते.
वातावरण आनंददायी राहील याची काळजी घ्या
याशिवाय, झोपण्यापूर्वी, तुमच्या खोलीचे तापमान, प्रकाश आणि आवाज याची काळजी घ्या. चांगल्या झोपेसाठी आरामदायी आणि शांत वातावरण आवश्यक आहे. कमी प्रकाश, योग्य तापमान आणि कमी आवाज यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते. यांसारख्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास फायद्याचे ठरू शकते.