सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपल्या आरोग्याकडे म्हणावे तसे लक्ष द्यायला जमत नाही. त्यामुळेच अगदी तरुणांमध्येही उच्च रक्तदाब, मधुमेहासारखी समस्या दिसून येते. पण, योग्यवेळी आणि योग्य ती खबरदारी घेतल्यास काही आजार अथवा धोका टाळता येऊ शकतो. त्यापैकी एक म्हणजे हृदयविकाराच्या झटका.
हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारणे आणि दैनंदिन व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे. शारीरिक हालचालींमुळे हृदय निरोगी राहण्यास, रक्ताभिसरण सुधारण्यास, कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. दररोज व्यायाम केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. तसेच सायकलिंगही फायद्याचे ठरते. कारण, सायकलिंगमुळे हृदय मजबूत होते आणि हा एक चांगला कार्डिओ व्यायाम ठरतो. यामुळे पाय, गुडघे आणि हृदय मजबूत करते, रक्त परिसंचरण वाढवते आणि कॅलरी बर्न करते. आठवड्यातून किमान 5 वेळा तर तुम्ही सायकलिंग करणे गरजेचे आहे.
हृदयाच्या आरोग्यासाठी दररोज वेगाने चालणे खूप महत्वाचे आहे. हे हृदयाचे ठोके नियंत्रित करते, शरीरातील चरबी बर्न करतेच शिवाय रक्तप्रवाही सुधारते. आठवड्यातून 5 वेळा 30 ते 45 मिनिटे चालण्याचा सल्ला दिला जातो. हा सर्वात सोपा आणि प्रभावी कार्डिओ व्यायाम आहे. वेगाने चालल्याने हृदयातील रक्तप्रवाह सुधारतो आणि हृदय निरोगी राहते.
योगासने तणाव करतात दूर
योगासने आणि प्राणायामच्या माध्यमातून शरीरातील ताणतणाव कमी करता येतो. हे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो, तणाव कमी होतो आणि रक्तदाब नियंत्रित होतो. हे दररोज 20 ते 30 मिनिटे केले पाहिजे.