पुणे प्राईम न्यूज डेस्क: महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने पोल्ट्री व्यवसायिकांची चिंता वाढली होती. बर्ड फ्ल्यू झालेल्या पक्ष्यांमधून त्याचा प्रसार संसर्गाद्वारे मनुष्यालाही होऊ शकतो . आज बर्ड फ्लूची लक्षणे आणि त्याचा प्रसार कसा होतो ते जाणून घेऊ.
‘ही’ आहेत बर्ड फ्लूची लक्षणे:
सतत खोकला आणि उच्च ताप येणे, डोकेदुखी, सतत नाक वाहणे, उलट्या , मळमळ व जंत होणे. याबरोबरच घशात सूज येते. बर्ड फ्लु झालेल्या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होतो. डोळे दुखतात. जास्त थकवा जाणवतो. अशी लक्षणे सुरुवातीला दिसून येतात.
संसर्गाच्या माध्यमातून होतो प्रसार
बर्ड फ्ल्यू या रोगाचा प्रसार प्रामुख्याने कोंबड्या, टर्की मोर किंवा इतर पक्षांमुळे होतो. H5 N1, H 5N 9, H 5N8 या नवीन आढळलेल्या विषाणू व्यक्तीच्या डोळे, कान आणि तोंडाद्वारे हा विषाणू शरीरात प्रवेश करतो .
बर्ड फ्लू पासून सुरक्षित राहण्यासाठी ‘अशी’ घ्या काळजी
तुम्ही बर्ड फ्लू झालेल्या पक्षांपासून व त्यांच्या विष्टेशी किंवा पिसांशी संपर्क टाळायला हवा. तसेच जंगली तसेच पाळीव पक्षांपासून दूर रहा. बर्ड फ्लू ची लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात राहू नका.
हा विषाणू अत्यंत घातक आहे. त्यामुळे एकदा संसर्ग झाल्यानंतर 60 टक्के मृत्यू होतात. त्यामुळेच याबाबत अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.