पुणे प्राईम न्यूज डेस्क: तुम्ही निरोगी आरोग्यासाठी अनेक पोषक तत्वांचा आहारात समावेश करता. पंरतु आजकल धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि चुकिच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अनेकजन ऑफिस मधला मानसिक तणाव कमी करण्यासाठी सिगारेट पितात. परंतु सिगारेट प्यायल्यामुळे खरचं तुमचा मानसिक तणाव कमी होतो का? आणि सिगारेट पिण्याचे दुष्परिणाम काय होतात ते जाणून घेऊ.
डोपामाइन या हार्मोनचे प्रमाण वाढते
सिगारेटमध्ये निकोटीन नावाचा घटक असतो ज्याचा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. सिगारेट प्यायल्यामुळे तुमच्या मेंदूचे आरोग्य बिघडू शकते. सिगारेट प्यायल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये डोपामाइन या हार्मोनचे प्रमाण वाढायला लागते. डोपामाइन या हार्मोनमुळे तुम्हाला आनंद आणि आराम मिळतो. परंतु हा आनंद काही क्षणापुरताच असतो. तुम्ही सिगारेट प्यायल्यानंतर थोडा वेळ चांगले वाटते मात्र जसं जसं तुमच्या शरीरातील निकोटीनचा प्रभाव कमी होत जातो. तस तसे तुम्हाला अस्वस्थ वाटू लागते आणि मानसिक ताणाव वाढू लागतो.
‘असा’ कमी करा मानसिक तणाव…
मानसिक तणाव कमी करण्यासाठी तुम्ही चालणे किंवा कोणतीही शारीरिक हालचाल करायला हवी. पूर्ण श्वास घेण्याच्या व्यायामामुळे मानसिक ताण कमी होण्यास मदत होतो. तुमची झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा. चांगली झोप घ्या. तसेच मित्र आणि कुटुंबासह गप्पा मारून तणाव कमी करू शकता.