पुणे प्राईम न्यूज डेस्क: तुमच्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने होत असेल. मात्र ब्लॅक कॉफी पिण्याचे अनेक फायदे आहेत. हे तुम्हाला माहीत आहे का? काही लोक चहाच्या ऐवजी कॉफी प्यायला पसंत करतात, तर काही जणांना ब्लॅक कॉफी प्यायला आवडते. ब्लॅक कॉफीमध्ये कॅफिन असते. त्यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटायला लागते. याबरोबरच ब्लॅक कॉफीने तुमची मनस्थितीही चांगली राहते.
ब्लॅक कॉफी पिण्याचे ‘असे’ आहेत फायदे
वजन कमी करण्यास मदत: तुम्ही ब्लॅक कॉफी पिल्याने तुमचे वजन कमी होण्यास मदत होते. कारण कॉफीमध्ये कॅलरीज कमी असतात त्याच्याने वजन कमी होते. शरीरातील अतिरिक्त चरबी जाळली जाऊन तुमचे वजन नियंत्रणात येते.
हृदय निरोगी राहण्यास मदत: हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यास ब्लॅक कॉफी उपयुक्त ठरते. ब्लॅक कॉफीने तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहते. तसेच मज्जासंस्थेचे आरोग्य सुधारण्यासही फायदा होतो. त्याबरोबरच अल्झायमरचा धोकाही कमी होते.
त्वचा सुधारणे : ब्लॅक कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचेसाठी हानिकारक असलेल्या ऑक्सिडेटिव्हचे प्रमाण कमी करते. यासोबतच, ब्लॅक कॉफी त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मददगार ठरू शकते.