चेन्नई: छातीत दुखू लागल्याने प्रसिद्ध संगीतकार आणि ऑस्कर विजेते ए.आर. रहमान यांना चेन्नईतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. ए.आर. रहमान यांना अचानक छातीत दुखात असल्याचे सांगितले जात आहे. ए.आर. रहमान यांच्यावर चेन्नई येथील अपोलो रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रेहमानची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
ए.आर. रहमान यांना आंतरराष्ट्रीय दौऱ्यावरून परतल्यानंतर मानदुखीची तक्रार होती. मानदुखीच्या तक्रारीनंतर वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, ए.आर. रहमान यांच्या प्रकृतीबाबत पुढील अपडेट्स लवकरच उपलब्ध होऊ शकतात. दरम्यान, प्रकृती स्थिर राहिल्यास ए.आर. रहमान दुपारपर्यंत डिस्चार्ज देण्यात येईल. ए.आर. रहमान हे जगप्रसिद्ध संगीतकार, गायक आहे. ए.आर. रहमान यांनी जागतिक संगीत जगात वेगळी ओळख निर्माण केली.