भारत: सध्या भारतात हॉरर कॉमेडीचा ट्रेंड रुजला आहे. लोक मुंजा या चित्रपटानंतर हॉरर कॉमेडीला अधिक पसंती देतांना दिसत आहे. यापूर्वी श्रद्धा कपूरचा स्त्री हा हॉरर कॉमेडी चित्रपट चांगलाच गाजला होता. दरम्यान, झी स्टुडिओज आणि ब्राव्हो एंटरटेनमेंट यांना त्यांचा नवीन हॉरर कॉमेडी चित्रपट “कपकपी” ची घोषणा करताना फार आनंद होत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पहावी लागणार आहे कारण हा चित्रपट 23 मे 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संगीथ सिवन यांनी केले आहे. दिग्दर्शक संगीथ सिवन हे त्यांच्या उत्तम कथानक आणि मनोरंजक चित्रपटासाठी ओळखले जातात. “कपकपी” मध्ये प्रशंसित अभिनेते श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर मुख्य भूमिकेत दिसणार असल्याने चित्रपट नक्कीच रंजक असणार यात काही वाद नाही. चित्रपटाची टॅगलाइन, “आत्मा जी दर्शन दो ना!” अशी आहे,जी रोमांचक आणि मजेदार कथानकाचे संकेत देते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये एक रहस्यमय बोर्ड आणि एक भयानक हात आहे, जो चित्रपटाच्या भयानक घटकांची झलक देतो.
येथे पाहा पोस्ट:
“डर भी, हंसी भी” (भीती आणि हास्य) या अनोख्या थीमसह, “कपकपी” हा चित्रपट हटके काही पाहण्याचे आश्वासन देतो. झी स्टुडिओज आणि ब्राव्हो एंटरटेनमेंट निर्मित, हा चित्रपट भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाच वेळी प्रदर्शित होईल. एका अशा साहसी चित्रपटासाठी सज्ज व्हा जो तुम्हाला हास्य आणि भीतीने घाबरवून टाकेल.