मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची आई किम फर्नांडिस यांचे निधन झाले आहे. किम फर्नांडिस यांना 24 मार्च रोजी स्ट्रोक आल्यानंतर त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. निधनापूर्वी त्या 13 दिवस आयसीयूमध्ये होत्या. जॅकलिनला तिच्या आईच्या तब्येतीबद्दल कळताच ती सर्व काही सोडून मुंबईत परत आली. रविवारी सोशल मीडियावर जॅकलिन फर्नांडिसच्या अचानक मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे.
जॅकलिनचा जवळचा मित्र सलमान खान देखील तिच्या आईला भेटण्यासाठी रुग्णालयात गेला होता. किम फर्नांडिसचा अंत्यसंस्कार खाजगीरित्या केला आहे, ज्यामध्ये फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. जॅकलिन फर्नांडिसचे चाहते आणि हितचिंतक सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत. दरम्यान, 26 मार्च रोजी गुवाहाटी येथे होणाऱ्या आयपीएलला जॅकलिन फर्नांडिस परफॉर्म करणार होती. पण आईच्या रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी ऐकल्यानंतर ती मुंबईत परत आली होती.
जॅकलिनचा जन्म बहरीनमधील मनामा येथे झाला आणि ती एका बहु-वंशीय कुटुंबात वाढली. तिची आई किम मलेशियन आणि कॅनेडियन वंशाची होती, तर तिचे वडील एलरॉय फर्नांडिस श्रीलंकेचे आहेत. १९८० च्या दशकात किम एअर होस्टेस म्हणून काम करत असताना हे जोडपे भेटले होते.