मुंबई : अभिनेता आमिर खानची एक्स पत्नी रीना दत्ता हिच्या वडिलांचे निधन झाले आहे. बुधवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या निधनानंतर रिना हिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रिना हिच्या कठिण काळात आमिर खान पहिल्या पत्नीच्या कुटुंबासोबत आहे.
रिना हिच्या वडिलांबद्दल सांगायचं झालं तर, तिने वडील पूर्वी एअर इंडियामध्ये वरिष्ठ अधिकारी होते.मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वडिलांच्या निधनानंतर रिना हिच्या कुटुंबात दुःखाचं वातावरण आहे. फक्त आमिर खानच नाही तर त्याची वृद्ध आई झीनत हुसैन या देखील रिना दत्ता हिच्या घरी पोहोचल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.
आमिर खान आणि रीना दत्ता यांचा विवाह 1886 साली झाला. लग्नाच्या काही वर्षांपर्यंत आमिर खान आणि रीना दत्ता यांच्यात सर्वकाही ठीक होते. आमिर खान आणि रीना दत्ता यांना आयरा आणि जुनैद ही दोन मुले झाली. त्यानंतर आमिर खान आणि रीना दत्ता यांनी 2002 मध्ये घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतरही आमिर खान रीना दत्ता आणि तिच्या कुटुंबाची पूर्ण काळजी घेत आहे. काही काळापूर्वी आमिर खान आणि रीना दत्ताची मुलगी आयराचे लग्न झाले.
View this post on Instagram