Kantara 2 : ऋषभ शेट्टी अभिनीत आगामी ‘कांतारा २’ चित्रपटाच्या सेटवर एक भयानक घटना घडली आहे. अभिनेता ऋषभ शेट्टी याची महत्वाची भूमिका असणाऱ्या ‘कांतारा 2’ चित्रपटाच्या चित्रीकरणाचे काम सध्या सुरू आहे. कांताराच्या सक्सेसनंतर प्रेक्षक कांतारा 2 ची आतुरतेने वाट पहात आहे. दरम्यान, कपिल नावाचा एक ज्युनियर कलाकार पोहण्यासाठी गेला असता कोल्लूर सौपर्णिका नदीत बुडाला. शोध पथकाने शोध घेतला असता. कपिलचा मृतदेह संध्याकाळी सापडला. या घटनेनंतर चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे आणि कोल्लूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निर्मिती पथकासमोरील हे पहिले आव्हान नाही, कारण त्यांना यापूर्वी बस अपघात आणि चित्रीकरणादरम्यान स्थानिक जीवसृष्टीला बाधित केल्याप्रकरणी वन विभागाने केलेल्या कायदेशीर अडचणींना तोंड द्यावे लागले आहे.
कपिलच्या मृत्यूमुळे सेटवर दुःखाचे सावट पसरले आहे. दरम्यान, चित्रपट बनवतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे सेटवर काहीशी नकारात्मकता पाहायला मिळत आहे.