जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. भारतीय रेल्वेने देशभरातील तरुणांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. रेल्वे भरती मंडळाकडून (RRB) तंत्रज्ञ ग्रेड-1 आणि तंत्रज्ञ ग्रेड-3 या पदांसाठी एकूण 6 हजार 180 पदांची भरती केली जाणार आहे.

कधी सुरू होणार अर्ज प्रक्रिया?
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 28 जून 2025 पासून सुरू होणार असून, 28 जुलै 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल. इच्छुक उमेदवारांनी rrbapply.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. अर्जासाठी लागणारी लिंक 28 जूनपासून सक्रिय होईल.
पदसंख्या आणि भरतीचे तपशील
या भरतीमध्ये तंत्रज्ञ ग्रेड-1 साठी 180 पदे, तर तंत्रज्ञ ग्रेड-3 साठी 6000 पदांची भरती होणार आहे. ही पदे संपूर्ण भारतातील वेगवेगळ्या रेल्वे झोनमध्ये भरली जातील. या संदर्भातील अधिक तपशील लवकरच सविस्तर अधिसूचनेद्वारे जाहीर करण्यात येणार आहेत.
वयोमर्यादा
या दोन्ही पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 30 वर्षे असावे. अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय आणि दिव्यांग उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयात सूट दिली जाणार आहे.
पगार किती मिळेल?
निवड झालेल्या उमेदवारांना तंत्रज्ञ ग्रेड-1 साठी दरमहा 29,200 रुपये, तर तंत्रज्ञ ग्रेड-3 साठी 19,900 रुपये इतका पगार मिळणार आहे. यासोबतच, केंद्र शासनाच्या नियमांनुसार इतर भत्ते आणि सुविधा देखील लागू होतील.
कसा कराल अर्ज?
rrbapply.gov.in या संकेतस्थळावर जा
‘Apply Online’ लिंकवर क्लिक करा
नाव, वय, शैक्षणिक पात्रता, मोबाईल क्रमांक, ईमेल आदी माहिती भरा
फोटो व स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करा
अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा
अर्जाची प्रिंट आउट भविष्यासाठी जतन करून ठेवा
परीक्षा आणि निवड प्रक्रिया
सध्या फक्त प्राथमिक अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. परीक्षेचा नमुना, अभ्यासक्रम, पात्रता आणि निवड प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती लवकरच जाहीर होणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे आणि माहिती तयार ठेवावी.







