उरुळी कांचन, (पुणे) : महात्मा गांधी विदयालय उरुळी कांचन येथील १९ वर्षे वयोगट मुलांच्या संघाने जिल्हास्तरीय “डॉजबॉल” या क्रीडाप्रकारात प्रथम क्रमांक मिळविला असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य भारत भोसले यांनी दिली.
क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत क्रीडा अधिकारी खेड यांच्या संयुक्त विद्यमाने, जिल्हास्तरीय १७ ते १९ वर्षे वयोगट मुला – मुलींच्या “डॉजबॉल” स्पर्धेचे आयोजन २८ व २९ नोव्हेंबरला राजगुरूनगर (ता. खेड) येथील क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते. महात्मा गांधी महाविद्यालयाच्या मुले व मुलींच्या संघाने विजय मिळवून या संघाची विभागीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच यामध्ये १७ वर्षे वयोगटातून दोन मुले व दोन मुलींची आणि १९ वर्षे वयोगटातून १ मुलीची विभागीय निवड चाचणीमध्ये निवड करण्यात आली आहे.
महात्मा गांधी सर्वोदय संघाचे सर्व पदाधिकारी व विश्वस्त तसेच विद्यालयाचे प्राचार्य भारत भोसले यांनी विभागीय निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे कौतुक केले. या खेळासाठी मार्गदर्शन क्रीडा शिक्षक संगिता शिर्के, साहेबराव कुंभारकर व कृष्णा गुंड यांनी केले. तसेच विद्यालयाच्या खेळाडूनी उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाच्या नावलौकिकात भर पडल्याने मान्यवरांनी कौतुक केले.
दरम्यान, जिल्हा स्तरावरील संघातील खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे :- ऋषीकेश जाधव, रोहताश तुपसौंदर्य, कौशल कांबळे, वैभव बीठे, शिवकुमार गुप्ता, साई कड, अक्षय सुळे, रज्जाक सय्यद, गौरव काकडे
विभागीय पातळीवर विदयार्थी :- मधुरा मुर्गे, कार्तिकी कांबळे, कादंबरी कांचन