पुणे : आयसीएसई दहावी परीक्षेचा निकाल काल (रविवारी) जाहीर झाला. महाराष्ट्राचा १००% निकाल लागला आहे. पुण्याची हरगुन कौर मथारू, अनिका गुप्ता (कानपूर), पुष्कर त्रिपाठी (बलरामपूर) आणि कनिष्क मित्तल (लखनऊ) या चौघे टॉपर्स ठरले आहेत.
चार विद्यार्थ्यांना ५०० पैकी ४९९ गुण मिळवले आहेत. ३४ विद्यार्थी ४९८ गुण मिळवून द्वितीय स्थानी आहेत. ७२ विद्यार्थ्यांनी ४९७ गुण मिळवून तिसरे स्थान मिळवले आहे. सीआयएसईने दोन वर्षांनंतर गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. पहिल्या तीन स्थानांवर एकूण ११० विद्यार्थी असून तीन रँकमध्ये केवळ एक-एक गुणाचे अंतर आहे.
द्वितीय स्थान मिळवणाऱ्या ३४ विद्यार्थ्यांत ८ महाराष्ट्रातील आहेत. त्यामध्ये अमोलिका अमित मुखर्जी,आद्या गौर, वेदांग खार्ये , वर्षा शाम सुंदर, पवित्रा प्रसाद आचर, अनन्या प्रमोद नायर (सर्व मुंबई) विधी चौहान (पुणे) शिवानी ओंकारनाथ देव (पुणे) यांचा समावेश आहे.