उरुळी कांचन : शैक्षणिक क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या शाळांपैकी एक परिपूर्ण आणि पालकांचा विश्वास संपादन करणारी शाळा म्हणजे अष्टापूर (ता. हवेली) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होय. विद्यार्थी हा शाळेचा केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव धडपड करणारी शाळा म्हणून या शाळेची ओळख आहे. असे प्रतिपादन प्रिंट व डिजिटल मिडिया पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सुनील जगताप यांनी केले आहे.
अष्टापूर (ता. हवेली) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी अष्टापूर ग्रामपंचायतीच्या वतीने प्रिंट व डिजिटल मिडिया पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना वरील प्रतिपादन सुनील जगताप यांनी केले आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या कल्पना जगताप, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष जगताप, सरपंच अश्विनी कोतवाल, उपसरपंच सोमनाथ कोतवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अष्टापूर ग्रामपंचायतीच्या वतीने प्रिंट व डिजिटल मिडिया पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुनील जगताप, खजिनदार विजय काळभोर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र काळभोर, जिल्हा समन्वयक तुकाराम गोडसे, हवेली तालुकाध्यक्ष संदीप बोडके, कार्याध्यक्ष सचिन सुंबे, उपाध्यक्ष चंद्रकांत दुंडे, उपाध्यक्ष अमोल अडागळे, अमोल भोसले, सल्लागार जेष्ठ पत्रकार तुळशीराम घुसाळकर आणि रियाज शेख यांचा सत्कार करण्यात आला.
प्रिंट व डिजिटल मिडियाचे पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र उर्फ बापूसाहेब काळभोर म्हणाले कि, शाळेत आज चांगल्या पद्धतीचे शिक्षण व संस्कार शाळेतून दिले जात आहेत. त्यामुळे या शाळेत तळागाळातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ‘तदिव्य परम धाम सारस्वतमुपास्महे’ या विचारधारेवर या शाळेची पायाभरणी झाली असून ‘लाइफ इज वर्क’ या ब्रीदवाक्यावर शाळेचा अखंड ज्ञानयज्ञ सुरू राहावे. असे काळभोर यांनी यावेळी सांगितले.
माजी पंचायत समिती सदस्य सुभाष जगताप म्हणाले, विद्यार्थांना पुस्तकी परीक्षार्थी न बनवता ज्ञानार्थी बनवण्याचे कार्य ही शाळा करते. त्यामुळे अनेक उपक्रम नेहमीच शाळेत सुरू असतात. वक्तृत्व, काव्यवाचन, निबंध, चित्रकला आदी स्पर्धा शाळेत होत असतात.
या शिवाय मैदानी खेळांतही या शाळेचे विद्यार्थी चमकदार कामगिरी करत आहेत. आपल्या संस्कृतीचा वारसा या शाळेतील विद्यार्थी जपत आहेत. सगळे सणसमारंभ विद्यार्थी आणि शिक्षक हिरीरीने सहभागी होऊन साजरे करतात.
यावेळी माजी सरपंच नितीन मेमाणे, ग्रामपंचायत सदस्य संजय कोतवाल, सुभाष कोतवाल, अलका कोतवाल, रेश्मा ढवळे, माजी उपसरपंच शामराव कोतवाल, श्रीहरी कोतवाल, शाळा व्यवस्थापन समितीचे किरण कोतवाल, रमेश कोतवाल, दीपक कोतवाल, कल्पना कोतवाल, उर्मिला कोतवाल, शीतल कोतवाल, महेश कोतवाल, राहुल कोतवाल, नितीन कोतवाल, आण्णा कोतवाल, निता भालेराव, तयाजी जगताप, शिवाजी कोतवाल, विक्रम कोतवाल, शिक्षक तुकाराम कांबळे, मंगल खांदवे, राजेंद्र कदम व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांना प्राथमिक शाळेत तयार करण्यात आलेली शिवसृष्टी दाखविण्यात आली. अष्टापूर सारख्या छोट्या गावात, गावक-यांनी आपल्या गावातील लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाविषयी सविस्तर माहिती मिळावी. म्हणून हा शिवसृष्टीचा उपक्रम राबविला आहे. एका वर्गखोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना चित्ररुपाने रंगवून घेतल्या आहेत.
दरम्यान, या अनोख्या उपक्रमाबद्दल अष्टापूर ग्रामपंचायतीचे ग्रामस्थांचे व स्थानिक शिक्षण समितीचे राज्य भरातुन कौतुक होत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत विविध प्रयोग राबविणारी पुणे जिल्ह्यातील व बहुधा राज्यातील एक उत्कृष्ट शाळा असल्याचे पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये चर्चा आहे.