पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोग ३८५ जागांसाठी २८ मार्चपासून ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करीत आहे. त्याकरिता राज्य लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिध्द केली आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५’ या परीक्षेचे परिपत्रक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेले आहे. या परीक्षेत विविध विभागांतर्गत एकूण ३८५ रिक्त पदे भरली जातील. राज्य सेवेसाठी १२७ महाराष्ट्र वन सेवेसाठी १४४ बांधकाम विभाग अभियांत्रिकी सेवांसाठी ११४ यासह आदी पदांचा समावेश आहे.