मुंबई : नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. त्यात आता विविध कार निर्माता कंपन्यांकडून नव्या कार आणण्याची तयारी सुरु केली जात आहे. प्रसिद्ध कार निर्माता कंपनी Toyota Kirloskar Motor (TKM), मारुती सुझुकी, Hyundai, Tata आणि Mahindra नंतर भारतातील पाचवी सर्वात मोठी कार कंपनीनेही आपल्या आगामी धोरणांबद्दल माहिती दिली आहे. यावर्षी देखील कारची विक्री चांगली होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
2025 यावर्षी Toyota कंपनीला आपले विक्रीचे जाळे वाढवायचे आहे आणि नवीन मॉडेल्स बाजारात आणण्याची तयारीही करत आहे. गेल्या वर्षी कंपनीची विक्री चांगली झाली होती. एसयूव्ही आणि एमपीव्हीसारख्या वाहनांच्या मागणीत वाढ होण्याची कंपनीला अपेक्षा आहे. TKM उत्पादन कार्यक्षमता वाढवण्यावर आणि पर्यावरणासाठी चांगले काम करण्यावर देखील लक्ष केंद्रित करत आहे. कंपनी बॅटरीवर चालणारी वाहने म्हणजेच EV लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीला छोटी शहरे आणि खेड्यांमध्येही आपले अस्तित्व वाढवायचे आहे.
SUV-MPV च्या मागणीत वाढ होत असल्याचे समोर आले आहे. याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, टोयोटा इंडियाला यावर्षीही चांगली विक्री अपेक्षित आहे. कंपनी विक्रीसाठी आपल्या केंद्रांची संख्या वाढवेल आणि नवीन मॉडेल देखील लाँच करणार आहे. गेल्या वर्षी कंपनीने विक्रमी गाड्या विकल्या होत्या. या वर्षीही एसयूव्ही आणि एमपीव्ही वाहनांची मागणी कायम राहील, अशी कंपनीची अपेक्षा आहे