मुंबई : शेअर बाजारात सुरू असलेली घसरण आजही थांबण्याची चिन्हे दिसली नाहीत. मंगळवारी बाजार उघडताच तो कोसळला. सेन्सेक्समध्ये मोठी घसरण दिसून आली. प्रमुख बेंचमार्क निर्देशांक घसरताना दिसले. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 347.07 अंकांनी घसरून 72,738.87 वर तर निफ्टी 109.85 अंकांनी घसरून 22,009.45 वर पोहोचला.
मार्चच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशीही शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. शेअर बाजार उघडल्यानंतर अवघ्या तीन मिनिटांत सेन्सेक्स 450 हून अधिक अंकांनी घसरला. शेअर बाजाराने 9 महिन्यांतील सर्वात नीच्चांकी पातळी गाठली. युक्रेन आणि रशिया यांच्यातील टेरिफ वॉर आणि युद्धामुळे निर्माण झालेला राजकीय तणाव भारतीय शेअर बाजारासाठी परिणामकारक ठरत आहे.
5 जून 2024 नंतर सेन्सेक्स 72 हजार अंकांपेक्षा कमी झाला. गेल्या वेळी ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स 71 अंकांच्या पातळीवर दिसला होता. शेअर बाजारातील घसरणीमुळे अवघ्या 3 मिनिटांत गुंतवणूकदारांचे 1.33 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. सोमवारी बीएसईचे मार्केट कॅप 3,80,21,191.08 कोटी रुपये होते, जे मंगळवारी शेअर बाजार उघडल्यानंतर पुढील तीन मिनिटांत 3,78,87,914.33 कोटी रुपयांवर आल्याचे दिसले.