नवी दिल्ली : चांगला परतावा मिळावा यासाठी अनेकजण फिक्ड डिपॉझिट असो किंवा शेअर मार्केट या माध्यमांमध्ये गुंतवणूक करताना दिसतात. कोणत्याही बँकेत केलेली मुदत ठेव (FD) ही सुरक्षित आणि विश्वासार्ह गुंतवणूक मानली जाते. विशेषतः वृद्धांसाठी ही कमी जोखीम आणि चांगला परतावा देणारी गुंतवणूक आहे. तिचं नाव अमृत कलश एफडी योजना.
सध्या ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ (SBI) ची अमृत कलश एफडी योजना अशी गुंतवणूक संधी देते या अंतर्गत, तुम्हाला ठराविक कालावधीसाठी आकर्षक व्याजदरांचा लाभ मिळतो. SBI ची अमृत कलश FD योजना ही 400 दिवसांची ठेव योजना आहे. या योजनेत तुम्ही 31 मार्च 2025 पर्यंत गुंतवणूक करू शकता. यामध्ये सर्वसामान्यांना दरवर्षी 7.10 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याज मिळते. ही योजना त्यांच्यासाठी खूप चांगली आहे जे सेवानिवृत्त आहेत आणि त्यांना दरमहा निश्चित उत्पन्न हवे आहे.
जर एखाद्या व्यक्तीने यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले तर त्याला 400 दिवसांत सुमारे 7100 रुपये व्याज मिळेल. पण जर एखाद्या वृद्ध व्यक्तीने 1 लाख रुपये गुंतवले तर त्याला सुमारे 7600 रुपये व्याज मिळेल. ही योजना सर्वांसाठी फायद्याची अशी मानली जाते.