मुंबई : भारतात टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये कॉर्पोरेट प्रवास वेगाने वाढत आहे, ज्यामुळे हॉटेल उद्योगात बदल घडत आहे. पूर्वी व्यावसायिक प्रवास फक्त मोठ्या मेट्रो शहरांपुरता मर्यादित होता, पण आता तो छोट्या शहरांपर्यंत विस्तारत आहे. प्रादेशिक आर्थिक विकास, सुधारित वाहतूक सुविधा आणि कंपन्यांचा लहान बाजारपेठांकडे वाढता कल ही यामागील कारणे असल्याचे म्हटले जात आहे. परिणामी, छोट्या शहरांमध्येही उच्च दर्जाच्या हॉटेल्सची मागणी वाढली आहे.
आता हॉटेल्स प्रवाशांना काम आणि विश्रांती दोन्ही प्रकारच्या सोयी पुरवत आहेत, यामध्ये लाँज, जिम आणि मनोरंजनासाठी खास जागा आदींचा समावेश आहे. याशिवाय, ‘ब्लीजर’ म्हणजे व्यवसाय आणि पर्यटन यांचा संगम करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. या शहरांतील हॉटेल्स आता कॉर्पोरेट प्रवाशांच्या पसंतीस उतरत आहेत. आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे कमी खर्चात उत्तम सेवादेखील आहे.
टियर-२ आणि टियर-३ शहरांतील हॉटेल्स मेट्रो शहरांच्या तुलनेत अधिक किफायतशीर असतात, पण सेवेत कोणतीही तडजोड केली जात नाही. त्यामुळे बजेटमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांनाही उत्कृष्ट सुविधा मिळत आहेत. भारतातील कंपन्या छोट्या शहरांकडे वळत आहेत, टियर-२. आणि टियर-३ शहरे कॉर्पोरेट प्रवासासाठी महत्त्वाची बनत आहेत. हा बदल स्थानिक अर्थव्यवस्थांना बळकटी देत आहे