नवी दिल्ली : शेअर बाजारात सातत्याने चढउतार होताना दिसत आहे. त्यात आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मोठी घसरण झाल्याचे पाहिला मिळाले. सोन्याच्या दरातही घसरण सुरू झाली आहे. गेल्या पाच दिवसांपासून सोन्याच्या किमतीत घसरण सुरू आहे. मंगळवारी सोन्याच्या किमतीतही घसरण झाली. पण, येत्या काळात ही घसरण आणखी मोठी होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.
सोन्याच्या दरात कपात होत आहे. त्यात जर सोन्याच्या किमतीबद्दल केले जाणारे भाकित खरे ठरले तर 10 ग्रॅम सोन्याचे दर 55000-56000 रुपयांपर्यंत पोहण्याचा अंदाज आहे. मंगळवारी सोन्याच्या किमतीत 400 रुपयांची घसरण झाली. गेल्या दोन दिवसांत सोन्याचे दर 2700 रुपयांपेक्षा जास्त घसरले आहेत. देशातील बहुतेक शहरांमध्ये सोने स्वस्त झाले आहे.
पण, आता सोन्याच्या दरात कपात होणार असल्याचे म्हटले जात आहे. कारण, सोन्याचा पुरवठा वाढला आहे. सोन्याच्या किमतीतील सर्वात मोठी घसरण देखील सांगितली आहे. जागतिक स्तरावर सोन्याचे उत्पादन वाढले आहे, ज्यामुळे सोन्याच्या साठ्यात 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सोन्याचा पुरवठा वाढल्याने अतिरिक्त पुरवठा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सोन्याच्या किमतीत घसरण दिसून येते.
दरम्यान, पुरवठा वाढत असताना, मागणीत सतत घट होत आहे. सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे किरकोळ खरेदी देखील कमी होत आहे. त्याचवेळी, मध्यवर्ती बँका सतत सोने खरेदी करत आहेत, जे येत्या काळात कमी होऊ शकते. मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या किमतीत घसरण होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.