नवी दिल्ली : फेब्रुवारी महिना संपत आला आहे. आता विवाह मुहूर्तही सुरु होत आहेत. त्यामुळे दागिन्यांची खरेदीही सुरु होणार आहे. असे असताना सोने-चांदीचे दरात चढ-उतार पाहिला मिळत आहे. देशात सध्या 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम प्रति 86090 रुपये झाले आहेत. गेल्या काही ट्रेंडच्या तुलनेत हे दर काही प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे.
‘ऑल इंडिया बुलियन असोसिएशन’नुसार, मागील काही दिवसांच्या चढ-उतारानंतर आता शनिवारी सोने-चांदीच्या दरात वाढ नोंदवली गेली. शनिवारी पुन्हा एकदा सोने महागले आहे. अहमदाबादमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 87600 रुपये आणि 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 80300 वर गेले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 200 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. यामुळे 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 877500 रुपयांवरुन 877700 रुपये इतका झाला आहे. तसेच 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 20 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे हा दर 87750 रुपयांवरुन 87770 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.
असे आहेत पुण्यातील सोन्याचे दर…
पुण्यात सध्या 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 86470 रुपये असून, मागील ट्रेडमध्ये ही किंमत काही फरकाने वाढल्याचे दिसून आले. तर 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 80300 रुपये झाला आहे. तर चांदीचे दर प्रतिकिलो 98500 रुपयांवर गेले आहेत.