मुंबई : मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारामध्ये सातत्याने घसरण सुरू असल्याचे दिसत आहे. गुंतवणुकदारांचे रोजच्या रोज कोट्यवधी रूपयांचे नुकसान होत आहे. अशावेळी गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून गुंतवणुकदारांनी सोन्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे सोन्यात तेजी पाहायला मिळत आहे. यामुळे मागील काही दिवसांत सोने 1300 रुपयांनी महाग झाले आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर तसेच घरगुती बाजारात देखील सोन्याची वाढ झाली आहे.
10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे कालचे दर खालीलप्रमाणे
- मुंबई : 80477 रुपये
- नोएडा : 80646 रुपये
- चेन्नई : 80616 रुपये
- कोलकाता : 80745 रुपये
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार 17 फेब्रुवारीला 10 ग्रॅम सोन्याचा दर 85254 रुपये होता. तर 18 फेब्रुवारीला 24 कॅरेट सोन्याचा दर 85690 रुपये, 19 फेब्रुवारीला 86733, 20 फेब्रुवारीला 86520 रुपयांपर्यंत सोन्याचे दर जाऊन पोहोचले होते.
सोन्याच्या दरवाढची नेमकं कारणे काय?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर जगभरात महागाई वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याची निवड होत असलेली दिसून येत आहे. तसेच शेअर बाजारात होणारी घसरण त्यामुळंही गुंतवणूकदार सोने खरेदीकडे वळत आहेत. या सर्व कारणांमुळे सोन्याचे दर वाढत असल्याचे दिसून येत आहे.